फलटण : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण पंचायत समितीच्या आखाड्यात मतदारांनी अभूतपूर्व निकाल दिला आहे. 'तू शेर तर मी सव्वाशेर' असा कौल देत मतदारांनी दोन्ही आघाड्यांना प्रत्येकी ८-८ जागांवर विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे फलटण पंचायत समितीच्या सत्तेची चावी आता कोणाकडे जाणार, याचा फैसला चक्क 'ईश्वर चिठ्ठी'वर (लॉटरी पद्धतीने) होणार हे आता स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, जिल्हा परिषदेत मात्र रामराजेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे गट) ५ जागा जिंकत आपला गड राखला आहे.
फलटणच्या रणांगणात रामराजे नाईक निंबाळकर व संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना विरुद्ध खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांची भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) महायुती असा थेट सामना रंगला होता. ७२ टक्के विक्रमी मतदानानंतर आज शासकीय गोदामात मतमोजणी पार पडली आणि निकालाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
दोन्ही बाजूंना समान जागा मिळाल्याने आता सभापती आणि उपसभापती निवडताना मोठा पेच निर्माण होणार आहे. समसमान ताकद असल्याने सत्तेचा लंबक ईश्वर चिठ्ठीने ज्याच्या बाजूला झुकेल, त्याचाच सभापती होणार आहे. त्यामुळे सदस्यांची पळवापळवी आणि फोडाफोडी रोखण्यासाठी आता नेत्यांची कसोटी लागणार आहे. काही ठिकाणी फेरमतमोजणी झाली, पण निकाल तोच राहिला.
कोण कोणावर भारी?
जिल्हा परिषद (एकूण ८ जागा): येथे राजे गटाने (शिवसेना) ५ जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले आहे, तर भाजप-राष्ट्रवादी युतीला ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. पंचायत समिती (एकूण १६ जागा): खरी चुरस इथे पाहायला मिळाली. शिवसेनेला ८ आणि भाजप-राष्ट्रवादी युतीलाही ८ जागा मिळाल्या आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे
१) तरडगाव / नागरिकांचा मागास प्रवर्ग
गिरीश सुदाम बनकर (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी
सूर्यकांत कृष्णा खरात (भाजपा) – पराभूत
२) साखरवाडी-पिंपळवाडी/ अनुसूचित जाती महिला प्रवर्ग
रुपाली लक्ष्मण सरगर (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी
कांबळे संचिता सागर (भाजपा) – पराभूत
३)विडणी / अनुसूचित जाती महिला प्रवर्ग
ज्योती गौतम मोरे (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी
सुषमा अविनाश मोरे (राष्ट्रवादी अजित पवार) – पराभूत
४)गुणवरे / अनुसूचित जाती महिला प्रवर्ग
जगताप हेमलता अनिल (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत
ऋतुजा अभिजीत जगताप (राष्ट्रवादी अजित पवार) – विजयी
५)बरड / अनुसूचित जाती प्रवर्ग
वैशाली संदीप कांबळे (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी
भाऊसाहेब पोपट मोरे (भाजपा) – पराभूत
६)कोळकी / सर्वसाधारण प्रवर्ग
सह्याद्री सूर्याजीराव कदम (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी
जयकुमार अरविंद शिंदे (भाजपा) – पराभूत
७)वाठार (निंबाळकर) / नागरिकांचा मागास प्रवर्ग
निलेश बापुराव लोखंडे (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत
विष्णु किसन लोखंडे (भाजपा) – विजयी
८)हिंगणगाव / सर्वसाधारण महिला प्रवर्ग
सारिका धैर्यशील ऊर्फ दत्ताबापु अनपट (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत
किरण निलेश नलवडे (भाजपा) – विजयी
एकूण ८ पैकी
भाजपा – २
राष्ट्रवादी अजित पवार – १
शिवसेना एकनाथ शिंदे – ५
पंचायत समिती गण
१) दुधेबावी / सर्वसाधारण महिला प्रवर्ग
मनिषा लक्ष्मण सोनवलकर (भाजपा) – पराभूत
सौ.विजया हनुमंत सोनवलकर (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी
२) कोळकी / सर्वसाधारण प्रवर्ग
अशोक गेनबा नाळे (शिवसेना एकनाथ शिंदे) -पराभूत
विकास अशोक नाळे (भाजपा) – विजयी
३) जाधववाडी (फ) / सर्वसाधारण
अमोल दशरथ सस्ते (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी
युवराज नरसिंग सस्ते (भाजपा) – पराभूत
४) वाठार (निंबाळकर) / सर्वसाधारण महिला
स्वाती विकास तरटे (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत
शुभांगी तुकाराम शिंदे (भाजपा) – विजयी
५) सुरवडी / सर्वसाधारण प्रवर्ग
किरण लक्ष्मणराव साळुंखे (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत
धनंजय प्रल्हादराव साळुंखे (भाजपा) – विजयी
६) सासवड / नागरिकांचा मागास प्रवर्ग
संतोष अंकुश कारंडे (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी
संतोष हणमंत खताळ (भाजपा) – पराभूत
७) हिंगणगाव / सर्वसाधारण महिला
सीमा शरद भोईटे-इनामदार (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत
सौ.सीमा सुरेश भोईटे (भाजपा) – विजयी
८) पाडेगाव / सर्वसाधारण प्रवर्ग
राहुल दादासो नरुटे (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी
अमोल बन्यासो खराडे (भाजपा) – पराभूत
९) तरडगाव / सर्वसाधारण महिला प्रवर्ग
योगिता दीपक गायकवाड (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी
स्मिता प्रशांत गायकवाड (भाजपा) – पराभूत
१०) साखरवाडी-पिंपळवाडी / नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
माडकर कमलताई शंकर (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत
शिवांजली विक्रमसिंह भोसले (राष्ट्रवादी अजित पवार) – विजयी
११) सस्तेवाडी / नागरिकांचा मागास प्रवर्ग
तांबे गणेश मल्हारी (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी
विजय अप्पासो भिसे (भाजपा) – पराभूत
१२) सांगवी / नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
सौ. पुष्पा रामचंद्र चोपडे (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी
सौ. सारिका संजय सोडमिसे (राष्ट्रवादी अजित पवार) – पराभूत
१३) विडणी / सर्वसाधारण प्रवर्ग
सचिन गजानन अभंग (भाजपा) – विजयी
डॉ. किरण उत्तमराव शेंडे (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत
१४) गुणवरे / अनुसूचित जाती महिला प्रवर्ग
वैशाली अतुल कांबळे (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत
वनिता धनाजी आढाव (राष्ट्रवादी अजित पवार) – विजयी
१५) आसू / अनुसूचित जाती प्रवर्ग
भिमराव दामोदर पवार (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत
संजय रघुनाथ पवार (राष्ट्रवादी अजित पवार) – विजयी
१६) बरड / सर्वसाधारण महिला प्रवर्ग
आटोळे स्वाती हणमंत (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी
अनिता संतोष गावडे (भाजपा) – पराभूत
एकूण १६ पैकी
भाजपा – ५
राष्ट्रवादी अजित पवार – ३
शिवसेना एकनाथ शिंदे – ८