साताऱ्यात तीन मुलांवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; शहर पोलिस तक्रार, वाॅर्डबाॅयवर ‘पोक्सो’चा गुन्हा ​​​​​​​

by Team Satara Today | published on : 08 March 2026


सातारा - सातारा शहरातील एका नामांकित शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली असून, संबंधित शाळेतील तीन मुलांवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न झाला. हा घृणास्पद प्रकार शाळेतील वाॅर्डबाॅयने केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित वाॅर्डबाॅयवर ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाळेतील तीन मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याप्रकरणी शाळा प्रशासनातील अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित वाॅर्डबाॅयने सकाळी साडेसहा वाजता तीन शाळकरी मुलांसोबत चार ते पाचवेळा अश्लील कृत्य केले. या प्रकारामुळे मुले भयभीत झाली. घडलेल्या प्रकाराची मुलांनी वाच्यता करू नये म्हणून त्यांना धमकीही देण्यात आली. मुलांना मारहाण करून हात पिरगळा तसेच डोके आपटले. हा धक्कादायक प्रकार २५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी तसेच ७ मार्च २०२६ या कालावधीत घडला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित वाॅर्डबाॅयवर बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाॅर्डबाॅयने केलेला घृणास्पद प्रकार काही मुलांनी आपल्या पालकांना तसेच शाळेतील शिक्षकांना सांगितला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उंडाळेच्या साईराज पाटील यांची यूपीएससीत ५४५ वी रँक; नोकरीचा राजीनामा देऊन यूपीएससीची तयारी, चौथ्या प्रयत्नात यश
पुढील बातमी
वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील रस्त्यांसाठी 29.77 कोटी मंजूर : ना. मकरंद पाटील, ग्रामीण, पर्यटन क्षेत्रातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार

संबंधित बातम्या