मुंबई : लग्नसराईचा हंगाम असून सर्वजण एकापाठोपाठ लग्नबंधनात अडकत आहेत. सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. आता गायक अरमान मलिक अखेर लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांची गुपचूप लग्न उरकले असून चाहत्यांना सुखद धक्का दिला. दोघांच्या चाहत्यांसाठी हे मोठे सरप्राईज होते.
अरमानने त्याच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या तुफान व्हायरल होत असून अरमान आणि आशनावर शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव होत आहे.
अरमान मलिकने फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तू माझं घर आहेस.’ , अरमान त्याच्या लग्नात गुलाबी रंगाच्या शेरवानीत पहायला मिळाला. अरमानची वधू आशनाने केशरी रंगाचा लेहेंगा घातला होता ज्यासोबत तिने गुलाबी रंगाचा दुपट्टा घातला होता. वधूच्या पोशाखात आशना खूपच सुंदर दिसत होती.
अरमान आणि आशनाने गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 2024 मध्ये साखरपुडा करत त्यांनी नातं अधिकृतरित्या सांगितले होते. अखेर आज दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. प्रसिद्ध गायक अरमानची नवीन वर्षात नवीन इनिंग सुरू झाली आहे.
दरम्यान, अरमान मलिकपेक्षा आशना वयाने मोठी आहे. अरमान 29 वर्षांचा असून आशना 31 वर्षांची आहे. मात्र वयाचे बंधन झुगारून दोघांनी आपले प्रेम खरे केले आणि अखेर लग्नही केले.