सातारा : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणार्या क्षेत्रमाहुली परिसरातील रामेश्वर मंदिराच्या वाकड घाटालगत गुरुवार दिनांक 14 रोजी सकाळी सातच्या दरम्यान अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मयत म्हणून घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हा मृतदेह पुरुष जातीचा अंदाजे 45 ते 50 वयाचा आहे. चेहरा गोल, रंग निमगोरा व उंची पाच फूट सहा इंच आहे. गळ्यामध्ये वारकरी माळ आहे. उजव्या हातात स्टीलचे पांढरे कडे असून अंगात फिकट गुलाबी रंगाचा शर्ट व कॉलरवर कोणतेही लेबल नाही.
क्षेत्र माहुली येथे आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
by Team Satara Today | published on : 15 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा