सातारा : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार प्राथमिक व माध्यमिक अभियान उपक्रमांतर्गत राज्यअंतर्गत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची निवड करून दिनांक एक मार्च व दोन मार्च 2026 रोजी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही तिन्ही सैन्य दलासाठी (Army,Navy, Airforce) अधिकारी तयार करणारी जगातील पहिली प्रशिक्षण संस्था आहे अशा संस्थेस परवानगी मिळणे तसे सोपे नसते परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः पाठपुरावा करून जिल्हा परिषद शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एनडीए ला भेट देता यावी व विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण व्हावी व जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधून अधिकारी घडावेत यासाठी एनडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अभ्यास दौऱ्यासाठी परवानगी मिळून दिली .
विद्यार्थ्यांना मध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच प्रयोगाच्या माध्यमातून वैज्ञानिक संकल्पना समजाव्यात या उद्देशाने जिल्हा परिषद विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्रस भेट देऊन विविध माहिती जाणून घेतली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विज्ञान केंद्रातील विविध शैक्षणिक मॉडेल्स,प्रयोग सामग्री, अवकाश विज्ञान, ऊर्जा, ध्वनी , प्रकाश तसेच तंत्रज्ञानाविषयी माहिती पाहिली विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग पाहिल्याने विज्ञानातील संकल्पना अनुभवण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले विज्ञान केंद्रातील तारांगण व विज्ञान पार्क विद्यार्थ्यांसाठी आकर्षण ठरले यामुळे विद्यार्थ्यांची विज्ञान विषयाची उत्सुकता वाढल्याचे सांगितले. त्यानंतर लाल महालास भेट देऊन शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात आला.
नाना फडणवीस वाड्यास भेट
इतिहासाची ओळख व्हावी व मराठी शाळेतील थोर व्यक्तिमत्त्वाची ओळख व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाड्यात भेट देऊन वाड्याची रचना त्या काळातील वास्तुकला नाना फडणवीस यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली पेशवेकालीन इतिहास व नाना फडणवीस यांच्या प्रशासनातील योगदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शनिवार वाड्यात भेट
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानात भर पडावी तसेच इतिहासाची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांची पुणे येथील ऐतिहासिक शनिवार वाड्यात भेट देऊन वाड्याची ऐतिहासिक रचना पेशवेकालीन वास्तू कला मराठा साम्राज्याच्या इतिहासातील माहिती घेतली शनिवार वाड्याचा इतिहास,पिशवीचे कार्य दिल्ली दरवाजा, व वाड्याचे सांस्कृतिक कार्य, तटबंदी, विहीर,कारंजे इत्यादी बाबतीत गाईडने वाड्याची माहिती दिली. या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना इतिहास प्रत्यक्ष अनुभवता आला असून त्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे या दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भेट देण्यात आली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाविषयी प्रेरणा मिळाली असून भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या अभ्यास दौऱ्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी नायकवडी या अधिकाऱ्यांनी या सहलीचे नियोजन केलेले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनीशैक्षणिक सहल पोचल्यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी चर्चा करून या शैक्षणिक सहलीचे फलित काय झाले याविषयी चर्चा करून मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.