एकावर तलवारीने वार; तीन अज्ञातांवर गुन्हा

सातारा : एकावर तलवारीने वार करून जखमी केल्याप्रकरणी तीन अज्ञातांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक रोजी सकाळी पावणे सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान दत्तात्रय सर्जेराव पवार रा. शाहूपुरी, सातारा हे शाहूपुरी चौक ते मोळाचा ओढा रस्त्याने मोटरसायकल वरून जात असताना तीन अनोळखी इसमांनी पल्सर गाडीवरून येऊन त्यांच्यावर तलवारीने वार केले. त्यानंतर ते निघून गेले आहेत. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.


मागील बातमी
अल्पवयीन मुलास मारहाण प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या