शाहूपुरी परिसरात मोबाईल चोरी करून एकाच्या बँक खात्यातील ३१ हजारांवर डल्ला

by Team Satara Today | published on : 17 May 2026


सातारा  : शाहूपुरी परिसरात विश्वास संपादन करून एका व्यक्तीचा मोबाईल चोरी करत त्याच्या खात्यातून तब्बल ३१ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील आझादनगर कॉलनीतील गणेश मंदिरासमोर ९ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. फिर्यादी मनीष माधवराव डेरे (वय ५८, रा. राधिका चित्रपटगृहाशेजारी) यांचा विश्वास संपादन करून प्रेम डी. सुर्वे याने त्यांचा मोबाईल चोरून नेल्याची तक्रार आहे.

मोबाईल चोरी केल्यानंतर आरोपीने मोबाईलमधील आर्थिक व्यवहारांचा गैरवापर करत संबंधित खात्यातून सुमारे ३१ हजार रुपये काढल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार राजगे पुढील तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा
पुढील बातमी
सैदापूरमध्ये बिअर बारसमोर हाणामारीप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा; घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण

संबंधित बातम्या