बसप्पाची वाडी येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पानमसाल्याच्या साठ्यावर धाड ; दांपत्य ताब्यात, वॅगनआर वाहनासह कारवाई

by Team Satara Today | published on : 25 June 2026


सातारा  : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सातारा तालुक्यातील बसप्पाची वाडी येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पानमसाल्याच्या साठ्यावर धाड टाकून २५ किलो गुटखा जप्त केला. या कारवाईत ६१ हजार ५१३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका वॅगनआर चारचाकी वाहनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणात पुनम रमेश चव्हाण आणि रमेश शंकर चव्हाण (रा. बसप्पाची वाडी, ता. सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाला बसप्पाची वाडी परिसरात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पानमसाल्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी पथकाने छापा टाकला. तपासणीदरम्यान एका बंद खोलीत तसेच वॅगनआर वाहनामध्ये पानमसाला व सुगंधी तंबाखूचा सुमारे २५ किलो साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ६१ हजार ५१३ रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.

सहआयुक्त एस. के. भोगावडे आणि सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आ. रे. खापणे व पी. एन. वाईकर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अन्वये कारवाई करण्यात आली असून गुटखा साठविण्याची जागा सील करण्यात आली आहे. तसेच संबंधित वाहनही जप्त करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन करा - माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पुढील बातमी
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर वाहनचोर गजाआड; शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या यशस्वी कामगिरी

संबंधित बातम्या