नवीन रास्त भाव दुकानांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी पुरवठा विभागाचे आवाहन

by Team Satara Today | published on : 02 January 2025


सातारा : सातारा जिल्हयातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता 122 गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने प्राधान्यक्रमानुसार मंजुर करण्याच्या दुष्टीने जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे.  नवीन रास्त भाव दुकानाच्या मंजूरीकरीता संबंधित ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यापैकी ज्यांना अर्ज करावयाचे असतील, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांचेकडे संपर्क साधून 1 जानेवारीपासून 31 जानेवारी 2025 अखेर आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदारांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

नवीन रास्तभाव दुकान प्राधान्यकमानुसार मंजूरी करीता सातारा तालुक्यातील 10 गावे,  वाई तालुक्यातील 17 गावे, कराड तालुक्यातील 7 गावे, महाबळेश्वर तालुक्यातील 44 गावे, कोरेगाव तालुक्यातील 10 गावे, खटाव तालुक्यातील 9 गावे, फलटण तालुक्यातील 4 गावे, पाटण तालुक्यातील 7 गावे, माण तालुक्यातील 5 गावे, खंडाळा तालुक्यातील 9 गावे, अशा एकूण 122 गावांचा समावेश आहे.  विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा सदर बाजार परिसरात वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमाला वाचकांची पसंती
पुढील बातमी
गायक अरमान मलिक अखेर लग्नबंधनात अडकला

संबंधित बातम्या