तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहरातील एकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 26 April 2026


सातारा :  सातारा शहरातील एकाने तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

रोहित जितेंद्र भोसले (वय २७, रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. सातारा) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. रोहित भोसले याला दि. ४ जुलै २०२५ रोजी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले होते. मात्र, शनिवारी (दि. २५) तो शिवाजी कॉलेज ते जिल्हा न्यायालय जाणाऱ्या रोडवर एसबीआय बॅंकेसमोर मिळून आल्याने पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार महांगडे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देगाव येथे दारु अड्ड्यावर छापा; एकास अटक, १७ हजारांचा मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
फलटण येथील गोळीबार मैदान परिसरात व्यायामासाठी गेलेल्या वयोवृध्देस पोलीस असल्याचे सांगून लुटले

संबंधित बातम्या