आंबेडकर विचार मंचचे सातारमध्ये धरणे आंदोलन

प्रवीण गायकवाड यांच्या मारहाणीचा केला निषेध

by Team Satara Today | published on : 16 July 2025


सातारा : संभाजी ब्रिगेड या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना धक्काबुक्की करून त्यांच्या समवेत गैरवर्तणूक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांनी सातार्‍यात बुधवारी घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले. 

या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, श्रमिक मुक्ती दल, शिवसेना(उबाठा), विद्रोही सांस्कृतिक चळवळ, आरपीआय (गवई), भीमशक्ती संघटना, कॉस्ट्राईब संघटना, दलित महासंघ, ओबीसी संघटना, मराठा क्रांती मोर्चा, मी मुस्लिम मावळा छत्रपतीचा, शेतकरी संघटना, डीपीआय, रिपब्लिकन सेना, बहुजन मुक्ती पार्टी, भारतीय रक्षक आघाडी, झोपडपट्टी सुरक्षा दल, बामसेफ आदी संघटनांनी भाग घेतला होता.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे घेराव घालून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. या प्रकाराचा महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. सातार्‍यातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. संभाजी ब्रिगेड रिपाई तसेच तत्सम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला मानणार्‍या अनेक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत जोरदार आंदोलन केले. या आंदोलनामध्ये संजय जगदाळे गणेश भिसे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाग घेतला होता. सर्व आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बैठक मांडून या घटनेचा निषेध केला. तसेच घडलेल्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत यापुढे असे प्रकार घडल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आंबेडकर संघटनांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन सादर करण्यात आले.

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध विविध संघटना करत आहेत. अशा रीतीने जाणीवपूर्वक समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला जातोय. यामध्ये कोण आहेत याचा उलगडा झाला पाहिजे, अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी सदस्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी अनिल जाधव, गणेश भिसे, डॉ. भारत पाटणकर, पार्थ पोळके, सुनील माने, अमित कदम, संजय गाडे, विजय मांडके, राजेंद्र शेलार, उमेश खंडूझोडे, माणिक अवघडे, अमोल पाटोळे, प्रमोद क्षिरसागर, अनिल बडेकर, अझर मणेर, अरबाज शेख, सादिक शेख, दिपक गाडे गणेश वाघमारे, महारूद्र तिकुंडे, अजित वाघमारे, ऋषिकेश गायकवाड, प्रकाश काशिलकर, विवेकानंद बाबर, सूर्यकांत चव्हाण, अस्लम तडमरकर, मिनाज सम्यद, विशाल भोसले, प्रा अजित गाढवे, गणेश चोरगे, रफिक शेख, अभिजीत सकटे यांच्यासहित सातारा जिल्ह्यातील शेकडो शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यात 36 टक्के पेरणी पूर्ण
पुढील बातमी
प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांच्या स्वागतासाठी आज बैठक

संबंधित बातम्या