सातारा : मागील २४ वर्षांच्या वाटचालीमध्ये माझ्यासोबत असणाऱ्या समर्थकांना मी न्याय देऊ शकलो नाही, तर काळ मला अजिबात माफ करणार नाही, अशी माझी भावना आहे. मलकापूर शहरातील प्रलंबित विकासकामांसाठी त्वरित ५१ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. तो निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो, त्यामुळे मलकापूरच्या विकासासाठी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे, असे मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नमूद केले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे राईट हॅंड म्हणून ओळखले जाणारे मनोहर शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजप प्रवेशाचा निर्णय माझ्यासाठी आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीतील सर्वांत कठीण गोष्ट ठरली आहे. मात्र, मलकापूर शहराचा विकास आणि समर्थकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून मी सत्ताधारी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.
मलकापूर शहराच्या विकास आराखड्याच्या माध्यमातून माझ्या समर्थकांसह अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडले आहे. शहरातील अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. भुयारी गटार योजना अपूर्ण अवस्थेत आहे. नवीन प्रशासकीय इमारतीसाठी लागणारा निधी, झोपडपट्टी वासीयांसाठीची घरे, शहराचा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी निधीची गरज भासणार आहे. निधी केंद्रात असणारे सरकार देऊ शकते, मनोहर शिंदे यांनी नमूद केले. मलकापूर शहरात २४ तास पाणीपुरवठा योजना राबवून मलकापूरचा नावलौकिक देशपातळीवर वाढवला. आम्ही राबविलेल्या अनेक विकासाभिमुख योजनांची दखल सरकारने घेतली.
मलकापूर शहराच्या विकास आराखड्याच्या माध्यमातून माझ्या समर्थकांसह अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडले आहे. शहरातील अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. भुयारी गटार योजना अपूर्ण अवस्थेत आहे. नवीन प्रशासकीय इमारतीसाठी लागणारा निधी, झोपडपट्टी वासीयांसाठीची घरे, शहराचा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी निधीची गरज भासणार आहे. निधी केंद्रात असणारे सरकार देऊ शकते. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रस्त्यांच्या कामासंदर्भात भेट घेतली. त्यावेळी तिथे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासमवेत भेट झाली. त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा आग्रह धरला, तसेच सोबत आलो, तर शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी चर्चा झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना विचारात घेऊन शहरवासीयांच्या हिताचा विचार व कार्यकर्त्यांचे प्रश्नांसाठी मुख्य प्रवाहात म्हणजेच भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी नमूद केले.