सातारा : हद्दपार आदेशाचा भंग करून अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रेम आबासाहेब आडागळे (रा. शाहूपुरी, सातारा) याला हद्दपार करण्यात आले होते. मात्र तो दि. 3 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हिंदवी पब्लिक स्कूल जवळ, शाहूपुरी, सातारा येथे चाकूसह आढळून आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल मनोज कुमार पवार यांच्या तक्रारीवरून आडागळे याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोहरे करीत आहेत.