सातारा : जागतिक वारसास्थळ असणार्या कास फुलोत्सवाची पर्वणी आता पर्यटकांसाठी खुली झाली असून पर्यटकांना वेगवेगळ्या टप्प्यात विविध नैसर्गिक रंगीबेरंगी फुले पाहता येणार आहेत. कास पठारावरील फुलांच्या हंगामाचे उद्घाटन गुरुवारी सातार्याच्या उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांच्या हस्ते झाले.
पर्यटकांना वेगवेगळ्या टप्प्यात विविध नैसर्गिक रंगीबेरंगी फुले पाहता येणार आहेत. त्यासाठी संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करायची आहे. प्रति पर्यटक 150 रुपये पर्यटन शुल्क व शालेय विद्यार्थ्यांसाठी 40 रुपये शुल्क आकारले जाणार असून विद्यार्थ्यांनी सोमवार ते शुक्रवार यायचे आहे. तसेच सोबत महाविद्यालय प्राचार्यांचे पत्र आवश्यक आहे. 12 वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश आहे. ऑनलाइन बुकिंगसाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर पर्यटकांना नोंदणी करावी लागणार आहे.
कास पठार कार्यकारी समितीकडून हंगाम सुरू करणे बाबतचे सर्व नियोजन पूर्ण झाले असून यावर्षी हंगामासाठी साधारणत: 130 स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
पठारावर फुले पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांना स्वच्छतागृह, पिण्यासाठी मिनरल वॉटर, विश्रांतीसाठी सहा नैसर्गिक झोपड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे येणार्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. कास पठारावर सद्यस्थितीत गेंद, सीतेची आसवे, सोनकी, चवर, टोपली, कारवी, भारांगी, धनगरी फेटा, तुतारी यांसह अनेक प्रजातींची फुले फुलायला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसात पोषक वातावरणानुसार फुलांचे गालीचे तयार व्हायला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे कास पठारावर फुले पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांना फुलांच्या बहराचा मनसोक्त आनंद घेता येईल, अशी माहिती कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय किर्दत यांनी दिली.
उद्घाटन कार्यक्रमावेळी सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौधाळ, तहसीलदार हनमंत कोळेकर, नायब तहसीलदार संजय बैलकर, वनक्षेत्रपाल हनमंत गमरे, कास समितीचे अध्यक्ष दत्तात्रय किर्दत, उपाध्यक्ष प्रदीप कदम, समितीचे सदस्य सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर आखाडे, विठ्ठल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |