सज्जनगड रन 2025 ला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भर पावसात निसर्गरम्य हिरवाईंने नटलेल्या गडावर स्पर्धक सुखावले

by Team Satara Today | published on : 18 August 2025


सातारा : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि रामदास स्वामींची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्रावरील श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीने रविवारी सकाळी सज्जनगड रन 2025 चे आयोजन करण्यात आले होते.

या समर्थ दौडीचा शुभारंभ भर पावसात आणि उत्साही स्पर्धकांच्या ..जय भवानी जय शिवाजी,.. जय जय रघुवीर समर्थ.. च्या जयघोषात मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व निसर्गप्रेमी छायाचित्रकार मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते गजवडी ते सज्जनगड रस्त्यावरील स्वागत कमानीपासून झेंडा फडकून करण्यात आला. दौडमार्गावर पावसाच्या सरी कोसळत असतानाही स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने ही दौड यशस्वीपणे पार केली. सज्जनगड येथे अंतिम टप्प्यांमध्ये पायऱ्या चढून वर आल्यानंतर पावसाळी वातावरणातच धुक्याचा नजारा आणि एकंदरीतच हिरवागार निसर्ग हा स्पर्धकांचा उत्साह अधिक वाढवताना दिसत होता.

या उपक्रमाला सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातून उपस्थित असलेल्या शेकडो धावपटूंनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला. रविवारी पहाटे या सज्जनगड रनचे उद्घाटन समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.अच्युत गोडबोले,कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, प्रवीण कुलकर्णी गुरुजी, समर्थ भक्त विद्याधरबुवा वैशंपायन, आमोद ताम्हणकर, गजाननराव बोबडे,  तसेच समर्थ मंडळाचे सहकारी संतोष वाघ, उत्तम तारळेकर व सज्जनगड वरील रामदासी मंडळींच्या उपस्थितीत गजवडी येथील अभयसिंहराजे भोसले विद्यालयाच्या वरील बाजूस असलेल्या स्वागत कमानी पासून ध्वज फडकावून करण्यात आली.

तत्पूर्वी सर्व स्पर्धकांनी विद्यालयाच्या प्रांगणात वॉर्मप करून स्पर्धेची तयारी केली. स्पर्धा सुरू होताना मान्यवर उपस्थित यांच्या हस्ते तसेच सर्व स्पर्धकांनी समर्थ रामदास स्वामींच्या नावाचा जयजयकार करत मनाचे श्लोक म्हणत ही अनोखी सज्जनगड रन 2025 सुरू झाली. हिरव्यागार निसल्यार्गाने नटलेल्या या सज्जनगडच्या अतिशय चढण असलेल्या रस्त्यावरूनही हे धावपटू अतिशय लीलया हे अंतर धावत कापत होते. मार्गांमधील ज्ञानश्री इंजीनियरिंग इन्स्टिट्यूटच्या प्रांगणाबाहेर मार्गावर स्पर्धकांसाठी पाणी तसेच या धावपटूंना उत्साहित करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मार्गावरून केशरी रंगाचे टी-शर्ट घातलेल्या धावपटूंना पाहताना अतिशय एक वेगळेच रम्य असे खेळाडूंचे दर्शन उपस्थिताना झाले. त्यानंतर या स्पर्धेतील शेवटचा अंतिम टप्पा म्हणजे सुमारे दीडशे पायऱ्यांची चढण पूर्ण करत हे सर्व धावपटू समर्थ सेवा मंडळाच्या कार्यालयाच्या प्रांगणात  या सर्व धावपटूंचा रामनामी प्रसाद तसेच पुष्पगुच्छ देऊन समर्थ भक्त योगेश व रामदासी यांच्या हस्ते सन्मान करून त्यांना प्रशस्तीपत्र, राम वस्त्र व सहभाग घेतल्याबद्दल अल्पोपहार देण्यात आला.

यावेळी उपस्थित धावपटूंना मार्गदर्शन करताना समर्थ भक्त योगेश व रामदासी म्हणाली की श्री समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच नागरिकांना आरोग्यांचा मंत्र द्यावा यासाठी ही समर्थ सज्जनगड 2025 आयोजित करण्यात आली होती. अतिशय चढाचा हा धाव मार्ग अठरा वर्षावरील पुरुष व महिलांसाठी पाच किलोमीटर, व 11 किलोमीटर अंतराच्या टप्प्यात असला तरी धावपटूंचा यामध्ये खऱ्या अर्थाने उत्स्फूर्त सहभाग हेच या उपक्रमाचे यश आहे. निसर्गरम्य परिसरात धावपटूंना आनंद मिळाला, तसेच त्यांच्यातील ऊर्जा समर्थ रामदास स्वामींनी खऱ्या अर्थाने अधिक वृद्धिंगत केली. नागरिकांचे आरोग्य सुदृढ व्हावे हाच या आयोजनाचा हेतू असून या स्पर्धेला आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल समर्थ सेवा मंडळ आपल्या सर्वांचे अभिनंदन करत आहे.

समर्थ सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरोग्य, समृद्धी आणि शांती यांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्थ दौड चे आयोजन केले. या दौड आयोजनामुळे समाजात शारीरिक, आरोग्य आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवण्यासाठीच हा चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग असून ज्यामुळे त्यांना शरीर आणि मन या दोघांनाही पोषण देणाऱ्या कारणासाठी एकत्र येण्याची ही संधी आहे, अशी माहिती मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त श्री योगेशबुवा रामदासी यांनी दिली. अशा प्रकारचा हा अनोखा उपक्रम श्री समर्थ सेवा मंडळांनी दरवर्षी चालू ठेवावा त्याला धावपटू निश्चितच मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करतील असे मत यावेळी मिलिंद गुणाजीनी व्यक्त केले. या समर्थ सज्जनगड 2025 मध्ये पुरुष धावपटू बरोबरच महिला तसेच छोट्या धावपटूचाही सहभाग विशेष दिसत होता. या दौडीची सांगता  या दौडीतील चार गटातील प्रथम तीन क्रमांकांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह वितरीत करण्यात आले. तसेच इतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रे ऑनलाईन देण्यात ची व्यवस्था करण्यात आली होती समर्थांचा प्रसाद वितरण झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.अच्युत गोडबोले, योगेशबुवा रामदासी आणि मिलिंद गुणाजी यांनी मंडळाच्या या सलग दोन वर्ष सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून भावी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या . समर्थ दौडीच्या आयोजनामध्ये विशेष सहकार्य म्हणून सातारा येथील दिवेकर हॉस्पिटलचे डॉ. अजिंक्य दिवेकर, त्यांचे सर्व कर्मचारी डॉक्टर्स व प्रतिनिधींनी या दौडीतील आरोग्य सुविधेसाठी विशेष परिश्रम घेतले. गडावरील वितरण व्यवस्थेत प्रसाद बुवा, सुभाषबुवा यांनी विशेष परिश्रम घेतले या समर्थ रन साठी मुख्य प्रायोजक फेडरल बँक, सह प्रायोजक म्हणून आय डी बी आय बँक यांचे सह सातारा जिल्ह्यातील विविध नामवंत संस्था यांनी सहकार्य केले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादीकडून पिंपोडेत रास्ता रोको
पुढील बातमी
दारूच्या व्यसनामुळे तोल जाऊन नदीत बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या