अंमली पदार्थाचे सेवन प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 17 May 2025


सातारा : अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील गार्डन सिटी इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत झाडाच्या आडोशाला बेकायेशीररीत्या गांजाचे सेवन करताना आढळून आल्याप्रकरणी अजय ज्ञानेश्वर दळवी (वय 25, रा. मल्हारपेठ, ता. सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस शिपाई सागर गायकवाड यांनी दि. 16 रोजी सायंकाळी 6.45 च्या दरम्यान कारवाई केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लाकडी दांडक्याने एकाला मारहाण
पुढील बातमी
अंबवडे येथे विद्युत मोटारीची चोरी

संबंधित बातम्या