सातारा : सातारा तालुक्यातील वर्णे येथे शेतीच्या कारणावरुन हाणमारीचा प्रकार दि. 19 रोजी सायंकाळी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास घडला असून परस्पर विरोधात तक्रारी बोरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अशोक कुशाबा पवार वय 70 रा. वर्णे, यांच्या फिर्यादीनुसार गट नंबर 122 मधील सतीश पवार यांच्या शेतात सतीश पवार आणि श्रीकांत सतीश पवार यांनी संगनमत करुन संगणमत करुन मारहाण केली. तर सतीश आनंदराव पवार, श्रीकांत सतीश दोघे (रा. वर्णे) यांनी अशोक कुशाबा पवार वय 70 वर्ष यांना कुदळीच्या दांडक्याने व पायावर लाथा मारुन जखमी करत तुला लय मस्ती आहे, तुला विळ्यानेच जीवंत मारतो अशी धमकी दिली. यावरुन गुन्हा दाखल केलेला असून तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हुले हे करत आहेत. तर सतीश आनंदराव पवार (वय 65 रा. वर्णे) यांच्या फिर्यादीवरुन अशोक गुजाबा पवार (रा. भवानी मंदिराच्या जवळ) दि. 19 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हातातील खोर्याने दोन वेळा मारुन जखमी केले. याचा तपास कारळे हे करत आहेत.
वर्णे येथे शेतीच्या कारणावरुन शेतीच्या कारणावरुन हाणामारी; बोरगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात तक्रारी
by Team Satara Today | published on : 21 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा