मतमोजणीच्या ठिकाणी एक किलोमीटर परिघांमध्ये येणाऱ्या सर्व नेट सर्वरला इंटरनेट जामर लावण्याची अपक्ष उमेदवारांची मागणी; निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदन

by Team Satara Today | published on : 16 December 2025


सातारा : नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी मतमोजणीच्या ठिकाणी इंटरनेट जामर लावण्याची मागणी केली आहे.  ही मतमोजणी शासकीय गोडाऊन असलेल्या एमआयडीसी येथे 21 तारखेला होणार असून किमान एक किलोमीटर परिघांमध्ये येणाऱ्या सर्व नेट सर्वरला जामर लावण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

पुढील आठ दिवसात या परिघात येणाऱ्या नवीन सर्व वाहनांची नोंद पोलीस प्रशासन यांच्याकडे घेणे गरजेचे आहे मतदान पेट्या या पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया हॅकर्सच्या माध्यमातून फेरबदल होण्याची शक्यतेबाबत लोकांच्यात चर्चा आहे मतदान प्रक्रियेसाठी जर इंटरनेट लागत नाही तर मतमोजणीसाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. मतमोजणी झाल्यावर निकाल जाहीर केल्यानंतर इंटरनेट प्रक्रिया घेण्यात यावी अशी विनंती अर्जात केली आहे.  यासाठी दक्षता म्हणून या परिसरातील इंटरनेटला जामर लावणे गरजेचे आहे अशी सर्व अपक्ष उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. 

पोलीस गोपनीय विभागाने या सर्व बाबींची दक्षता घ्यावी आणि पुढील आठ दिवसात ज्या ठिकाणी निवडणूक मशीन ठेवली आहे तेथे लाईट न जाण्याची खबरदारी विद्युत विभाग आणि पोलीस प्रशासनाने देखील घ्यावी असे सांगण्यात आले. यावेळी क्रॉस वोटिंग झाले आहे. अपक्ष उमेदवार निवडून येण्याच्या चर्चा रंगू लागले आहेत. त्यामुळे मशीनमध्ये घोळ व्हायला नको यासाठी हॅकरच्या माध्यमातून मतदान मशीनमध्ये फेरबदल होईल, अशी चर्चा सातारा शहरात असल्याची भीती अपक्ष उमेदवारांनी व्यक्त केली आहे.  या ठिकाणी इंटरनेट जामर लावला तर हा धोका कमी होऊ शकतो, असे मत अपक्ष उमेदवारांनी व्यक्त केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साहित्य संमेलने ही राष्ट्राचा मार्ग उन्नत करण्यासाठी असतात- साहित्यिक प्रा. शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ
पुढील बातमी
जिल्ह्यातील 625 महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; मावळ तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अवैध निलंबनाचा केला निषेध

संबंधित बातम्या