बांगला देशच्या नव्या राष्ट्रपतिपदी बीएनपीचे ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर

by Team Satara Today | published on : 21 August 2026


ढाका : बांगला देश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची गुरुवारी बांगला देशच्या नव्या राष्ट्रपतिपदी निवड झाली. तब्बल ३५ वर्षांनंतर राष्ट्रपती पदासाठी झालेल्या पहिल्या लढतीत आलमगीर यांनी प्रतिस्पर्धी कर्नल (निवृत्त) ओली अहमद यांचा पराभव केला. राष्‍ट्रपतीपदासाठी गुरुवारी मतदान पार पडले. आलमगीर यांचा शपथविधी शुक्रवारी होण्‍याची शक्‍यता आहे.

७८ वर्षीय आलमगीर हे सत्ताधारी बीएनपीचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष तसेच जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील ११ पक्षांच्या विरोधी आघाडीचे उमेदवार कर्नल (निवृत्त) ओली अहमद मैदानात होते.

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी एएमएम नासिरुद्दीन यांनी निकाल जाहीर करताना सांगितले की, मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांना २५५ खासदारांची मते मिळाली, तर ओली अहमद यांना ८८ खासदारांनी मते दिली.

आलमगीर यांनी स्पष्ट आघाडी मिळवत विजय नोंदवला. बांगलादेशच्या राजकारणात बीएनपीचे महत्त्वाचे नेते म्हणून आलमगीर यांची ओळख आहे. ३५ वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रपतीपदासाठी झालेली ही निवडणूक बांगलादेशच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. विरोधी आघाडीनेही आपला उमेदवार मैदानात उतरवल्याने यंदाची निवडणूक विशेष चर्चेत राहिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
RSS प्रमुख भागवतांच्या अमेरिका भेटीला कडाडून विरोध; USCIRF ची RSS सदस्यांवर बंदी घालण्याची मागणी
पुढील बातमी
सातारा जिल्हा बँकेत वेदांतिकराजे भोसले यांची एन्ट्री; आष्टे विकास सोसायटीतून वेदांतिकराजे भोसले यांच्या नावाचा ठराव, उदयनराजे गटाच्या भूमिकेकडे लक्ष

संबंधित बातम्या