सातारा : विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा संचलित शाहुनगर-शेंद्रे येथे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली अभयसिंहराजे भोंसले पदविका तंत्रशिक्षण इन्स्टिट्यूटमध्ये स्टेट लेव्हल टेक्निकल इव्हेंट TECHFEST- 2K25 हा कार्यक्रम उत्साहात झाला.
याप्रसंगी अंजिक्यतारा सह. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी सातारा जिल्हयातील सर्व डिप्लोमा इंजि. कॉलेज तसेच सातारा जिल्हयाबाहेरील कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत ३५० सहभागी झाले. मेकॅनिकल विभागामध्ये Poster Presentation हि स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये KBP कॉलेजमधील मुजावर आरसिया हिने प्रथम क्रमांक मिळविला व ज्ञानश्री कॉलेजमधील पायल विनोद घाडगे व प्रतिक्षा विजय शेळके यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. आय.टी विभागामध्ये General Quiz हि स्पर्धा घेण्यात आली कु. अलिशा इनामदार व विनायक जगदाळे या ए.बी.आय.टी. कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. पुर्वा मोहिते व पायल कोबुगडे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
इले. अॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागामध्ये Technovate Logic Building competition f स्पर्धा घेण्यात आली यामध्ये संस्कार संदिप नलवडे व यश दत्तात्रय घाडगे या विद्यार्थ्यांनी प्रथम व ABIT कॉलेजमधील मानसी सुधिर फाळके व सानिका रामचंद माने या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. कॉम्प्युटर विभागाने C Progamming Quiz व BGMI Tournament ( Pub-G) या स्पर्धेत C Progamming Quiz मध्ये KBP कॉलेजमधील हर्षदा संतोष बर्गे या विद्यार्थीनींने प्रथम क्रमांक मिळविला व (ABIT) कॉलेजमधील ढेब लिना प्रविणकुमार, पाटील पार्थ संजय यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. BGMI Tournament ( Pub-G) मध्ये SPS कॉलेजमधील राघव माने, सुदर्शन भिसे, सौरभ ननावरे, सत्यम नलवडे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकमिळविला तसेच DG कॉलेजमधील साहिल बर्गे, विघ्नेश जाधव, ओंकार देशमुख व ओंकार यादव यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
यावेळी तंत्रनिकेनतचे प्राचार्य धुमाळ एस. यु., उपप्राचार्य नलवडे आर. डी., मेकॅनिकल विभाग प्रमुख व कार्यक्रमांचे को - ऑर्डीनेटर कदम एस. एस. उपस्थित होते. कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन काझी सर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.