सातारा : सातारा शहर परिसरातून तीन विविध घटनेत तिघेजण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश अशोक बर्गे (वय 30, रा. शुक्रवार पेठ, सातारा) हे दि. 24 डिसेंबर रोजी कामावर जातो, असे सांगून घरातून निघून गेले. मात्र ते परत घरी आले नाहीत. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दुसर्या घटनेत प्रदीप लल्लू सिंग (वय 19, रा. कोडोली, सातारा मूळ रा. छत्तीसगड) हा युवक दि. 21 डिसेंबर रोजी बेपत्ता झाला आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
तिसर्या घटनेत सत्यजीत श्रीमंत पवार (वय 25, रा. कर्मवीर नगर, सातारा) हा युवक 24 डिसेंबर रोजी बेपत्ता झाला आहे. याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.