सातारा : माजगावकर माळ आकाशवाणी केंद्राजवळ राहणाऱ्या जाहिरात व्यावसायिकाला बेदम मारहाण करून त्याच्या पत्नीचे १२ ग्रॅमचे 74 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावल्याप्रकरणी माजगावकर माळ येथील लखन भीमराव मोरे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
मोरे यांनी फिर्यादी अक्षय जगताप आणि त्याच्या कुटुंबीयांना दांडक्याने मारहाण केल्याची फिर्याद आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 17 मार्च रोजी रात्री दहा वाजता मोरे यांनी दारू पिऊन काही कारण नसताना जगताप यांच्या आईला विनाकारण शिवीगाळ केली. त्याचा जाब विचाराला गेलेल्या अक्षय जगताप यांना दगड मारून जखमी केले तसेच बहीण अर्चना हिला सुद्धा ढकलून देत हाताने मारहाण केली आणि फिर्यादीची पत्नी अंकिता यांच्या गळ्यातील 74 हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून तुला संपवणार आहे अशी धमकी दिली. वडील कृष्णदेव जगताप यांना देखील दांडक्याने मारहाण करीत त्यांच्या चार चाकी वाहनाचे नुकसान केले .पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गोवेरे अधिक तपास करत आहेत