01:51pm | Sep 14, 2024 |
मुंबई : एसटीच्या संबंधीत प्रवाशांच्या असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आता महामंडळाने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. एसटी प्रवासात प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी आता प्रत्येक बसमध्ये आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुखांचे दूरध्वनी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास करताना प्रवाशांना आलेल्या तक्रारींचा निपटारा करणे सोपे होणार आहे.
एसटीचा प्रवास करताना अनेकदा प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतात.त्याची दाद कुठे मागायची याची अडचण असते. अनेकदा या संदर्भात परिपत्रकीय सूचना करण्यात आलेल्या आहेत. तरी देखील त्याचे पालन होतेच असे नाही. त्यामुळे आता प्रवाशांना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी आणि पर्यायाने एसटीची सेवा सुधारण्यासाठी आता एसटीच्या बसमध्येच आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुखाचे दूरध्वनी क्रमांक एसटीच्या बसच्या प्रदर्शनीय भागात लावण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटीचा चालक अति वेगाने बस चालवित आहे का ? चालक वाहन चालवताना मोबाईल पहात किंवा मोबाईलवर बोलत आहे का ? वाहकाने सुट्टे पैसे परत केले नाहीत का ? वाहकाचे वर्तन असभ्य आहे का ? योग्य थांब्यावर बस थांबविली नाही का ? बसचा तांत्रिक बिघाड झालेला आहे का ? अशा तक्रारी प्रवाशी मुख्यालयाकडे करतात. त्यामुळे एसटीच्या बसमध्ये आता चालकाच्या मागील बाजूस संबंधित आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुखाचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक लावण्यातचे आदेश महामंडळाने प्रत्येक आगाराला दिले आहेत.
21 सप्टेंबरपर्यंत एसटीच्या बसेसमध्ये दूरध्वनी क्रमांक लावण्याची कारवाई पूर्ण करावी असे परिपत्रक काढण्यात आले आहे. टेलीफोन जर बंद असतील तर ते तातडीने सुरु करावेत असेही या पत्रकात म्हटले आहे. दूरध्वनीवर आलेल्या तक्रारींचा रेकॉर्ड ठेवण्यात यावा आणि त्या प्रमाणे तक्रारींचा निपटारा करण्यात यावा. या कामात कुचराई केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ही भित्ती पत्रके लावण्यात येणारा खर्च आगार व्यवस्थापकांना असलेल्या आर्थिक खर्चाच्या अधिकारातून करण्यात यावा असे आदेशच उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी सर्व आगारांना दिले आहेत.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |