पांगारेतील बेकायदेशीर व्यवहार रद्द करण्याची मागणी-जमीन दलालांचा हैदोस; ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा

by Team Satara Today | published on : 27 December 2025


सातारा  : पांगारे,  ता. सातारा येथे जमीन दलालांचा हैदोस घातला असून येथील जमिनीचे हस्तांतरण विभाजन खरेदी विक्री, साठेखत व अन्य दस्तावेज नोंदणी करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. यात काहींनी बेकायदेशीर व्यवहार केले असून ते रद्द करण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व सहायक दुय्यम निबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पांगारे गावात २५ वर्षांपूर्वी सर्व ग्रामस्थांनी घेतलेल्या “गावातील जमीनी बाहेरील व्यक्तींना विकायची नाही” या ठराव असून त्याचे भंग केला आहे. काहींनी समाईक वहिवाटीच्या जागा आणेवारीच्या नोंदी रद्द केल्या आहेत. मूळ खातेदारांच्या नोंदी वारस हक्काने केल्या गेल्या नाहीत. पांगारे लघु पाटबंधारे प्रकल्पाची रेकॉर्डचुकीमुळे  अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. काहीजण गरजू शेतकऱ्यांचा गैरफायदा घेत पडद्यामागून जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार केला आहे. ग्रामसभेच्या ठरावानुसार अशा सर्व व्यवहारांद्वारे विकत घेतलेल्या जमिनी त्वरित रद्द करण्यात याव्यात.

गावातील अनेक जमिनींच्या कोणत्याही गट नंबरची वाटपपत्र अद्याप झालेली नाही, तसेच बहुतांश गट नंबर गोळा नंबर असून ज्याच्या वारसनोंदी अद्याप झालेल्या नाहीत व महसूल नोंदवहीत दाखल झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत अंधारात जमिनींचे व्यवहार झाल्यास भविष्यात मूळ जमीनमालक व त्यांच्या वारसांमध्ये गंभीर वादविवाद निर्माण होत आहेत. अशा बेकायदेशीर व्यवहाराचे महसूल विभागाने तातडीने गट फोडणी, वारसनोंदी व नोंदींची शाश्वत पडताळणी करावी. तसेच पांगारे गावातील जमीन खरेदी द्र्स्ट नोंदी करू नयेत अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच जर कोणी जमीन घेतल्या तर त्यांना वहिवाटीस रस्ता दिला जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. 


निवेदनावर अरुण पवार, बाळकृष्ण जाधव, वसंत जाधव, संदेश जाधव, चंद्रकांत जाधव, शिवाजी जाधव, कांता जाधव, सोनाली जाधव, केशव पवार यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोंडवे गावच्या हद्दीत डीपीमधून २४ हजार रुपये किमतीच्या तांब्याची तारेची चोरी
पुढील बातमी
एमआयडीसी ते धनगरवाडी रस्त्यावर संशयास्पद बोलेरो पिकअप पोलिसांकडून जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या