सातारमध्ये बौध्द जयंती निमित्ताने रॅली

by Team Satara Today | published on : 12 May 2025


सातारा : भारतीय बौध्द महासभा सातारा शाखा, रिपब्लिकन सेना, बौद्ध बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा शहरात सोमवारी सकाळी ११ वाजता छ. शाहु महाराज चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून बौद्ध जयंतीनिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करुन रॅली काढण्यात आली.ही रॅली पुढे कमानी हौद, देवी चौक, गोलबागेला वळसा मारुन मोती चौक, पाचशे एक पाटी, पोलीस मुख्यालय, शिवतीर्थ अशी पोहचली. शिवतीर्थ येथे छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करुन या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तुर्कीने पाकला पाठिंबा दिल्यामुळे तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार
पुढील बातमी
राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या कराड तालुका कार्याध्यक्षपदी सागर लादे

संबंधित बातम्या