04:13pm | Dec 28, 2024 |
सातारा : कराडच्या विद्यानगरमध्ये अपार्टमेंटमधील दुचाकी पार्किंगच्या वादातून तरूणानं सोसायटी अध्यक्षाच्या घरात घुसून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (२७ डसेंबर) रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. गोळीबारात गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष प्रदीप घोलप आणि त्यांची दहा वर्षांची मुलगी श्राव्या जखमी झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर सुरेश काळे (मूळ रा. तळबीड, सध्या रा. सैदापूर) या संशयितास ताब्यात घेत त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह १६ जिवंत काडतुसं जप्त केली आहेत.
गोळीबारानं विद्यानगरी हादरली
सैदापूरमधील विद्यानगरमध्ये अनेक महाविद्यालयं, कोचिंग क्लासेस आहेत. मुलांचं शिक्षण तसंच नोकरीच्या निमित्तानं परगावचे लोक विद्यानगरीत वास्तव्यास आहेत. त्यामुळं विद्यानगर हे एज्युकेशन हब बनलं आहे. आजुबाजुच्या तालुक्यातील माजी सैनिकांनी या परिसरात स्थावर मिळकती घेतल्या आहेत. याच विद्यानगरीतील होली फॅमिली स्कूलच्या मागील ओम कॉलनीतील अक्षरा रेसिडेन्सीमध्ये काल रात्री गोळीबाराची घटना घटना घडली.
पार्किंगच्या वादातून गोळीबार?
गोळीबारात जखमी झालेले प्रदीप घोलप हे गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी सैनिक आहेत. ते १२ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. संशयित हल्लेखोर सुरेश काळे हा त्याच सोसायटीत पहिल्या मजल्यावर पाच वर्षांपासून राहत आहे. शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास सुरेश काळे सोसायटीत आला. त्याने दुचाकी रस्त्यात आडवी लावली. दुचाकी बाजूला पार्क करा, असं सांगितल्यावरून घोलप आणि काळे यांच्यात वाद झाला. त्यानंतर अर्ध्या तासाने हल्लेखोर घोलप यांच्या घरी गेला. ते जेवत असतानाच त्यानं घरात घुसून थेट गोळीबार केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
गोळीबारात बाप-लेक जखमी
गावठी पिस्तुलातून झाडलेली गोळी प्रदीप घोलप यांच्या गालाला चाटून गेली, तर दुसरी गोळी मुलीच्या दोन्ही हातांना लागली. घोलप कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यामुळं लोक गोळा झाले. त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. पोलीस फौजफाटा दाखल झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. हल्ल्यानंतर संशयित सुरेश काळे यानं स्वतःला आपल्या घरात कोंडून घेतलं होतं. पोलिसांनी त्याला दरवाजा उघडायला लावला. त्यावेळी त्यानं पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीनं पकडलं.
हल्ल्याचं नेमकं कारण काय?
पोलिसांना संशयिताच्या घरातील धान्याच्या बॅरेलखाली लपवून ठेवलेली पिस्तूल आणि १६ जिवंत काडतुसं सापडली. संशयित पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समजतंय. दरम्यान, या घटनेमागे पार्किंगचा वाद की अन्य कोणतं कारण आहे, हे तपासात उघड होईल. या घटने संदर्भात सैदापूरात वेगळीच चर्चा सुरू आहे.
मारहाण प्रकरणी चारजणांवर गुन्हा |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा |
सोसायटी अध्यक्षाच्या घरात घुसून तरूणाचा पिस्तुलातून गोळीबार |
दि.7 ते दि.9 जानेवारी दरम्यान श्री शतचंडी यागाचे आयोजन |
तिहेरी अपघातात दुचाकी चालक ठार |
न्यू इंग्लिश स्कूल चे रविवारी 101वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा |
गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात 'छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना' या विषयावरील व्याख्यान |
उत्तेकर नगर मध्ये 55 हजारांची घरफोडी |
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
विलासपूर येथे सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार |
रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
आयेशा ताहेर मणेर हिचे सीए परीक्षेत यश |
सरपंच परिषदेचे रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन |
न्यू इंग्लिश स्कूल चे रविवारी 101वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा |
गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात 'छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना' या विषयावरील व्याख्यान |
उत्तेकर नगर मध्ये 55 हजारांची घरफोडी |
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
विलासपूर येथे सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार |
रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
आयेशा ताहेर मणेर हिचे सीए परीक्षेत यश |
सरपंच परिषदेचे रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन |
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी संघटनांचा सातारा शहरात मोर्चा |
बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये |
संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे |
तोतया ‘आयपीएस’चा आणखी सोळा जणांना गंडा |