नगरसेवक विश्वतेज बालगुडे यांच्या पुढाकारातून गणराया कॉलनीमधील प्रश्न मार्गी; गणराया वाचनालयाच्या जागेसंदर्भात सर्वमान्य तोडगा

by Team Satara Today | published on : 28 February 2026


सातारा : शाहूपुरीतील गणराया कॉलनीमध्ये काल गणराया मंदिराशेजारील मुख्य विद्युत वाहक तारा वाऱ्यामुळे एकमेकांना चिटकून ठिणग्या पडत होत्या आणि विद्युत तारा तुटण्याचा धोका होता. त्याचवेळी गणराया मंदिरामध्ये कॉलनीमधील वाचनालयाचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात मिटिंग सुरु होती आणि त्यासाठी नगरसेवक विश्वतेज बालगुडे हे देखील उपस्थित होते. विद्युत तारांचा धोका त्यांनी वेळीच ओळखून तातडीने MSEB च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून MSEB च्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले त्यांनी लगेचच आवश्यक ती दुरुस्ती केली आणि संभावित धोका टाळला. 

त्याच बरोबर गणराया वाचनालयाच्या जागेसंदर्भात सर्वमान्य तोडगा यावेळी बैठकीमध्ये काढण्यात आला आणि गणराया मंदिरासमोर पायऱ्यांच्या जवळ वाचनालय उभे करण्याचे सर्व सभासदांच्या मान्यतेने एकमताने मंजूर करण्यात आले. या प्रश्नामध्ये देखील श्री बालगुडे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. तसेच पुढील काळात देखील  कॉलनीमधील अडिअडचणी सोडवण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

याबद्दल कॉलनीचे जेष्ठ सदस्य श्री. कृष्णराव जाधव यांच्या हस्ते श्री बालगुडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सातारा जिल्हा ग्रंथालय कृती समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच मा. प्राचार्य डॉ यशवंत पाटणे यांची नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल त्यांचाही सन्मान श्री बालगुडे यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी गणराया कॉलनी मधील सर्व तरुण, आणि जेष्ठ सभासद उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भिलार येथे ‘अभिजात मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात; ‘यशदा’च्या प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली काव्यरूपी कृतज्ञता
पुढील बातमी
काँग्रेस हाच भाजपाला सक्षम पर्याय; २०२९ ला देशात काँग्रेसची सत्ता येईल - प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

संबंधित बातम्या