सातारा : सातारा शहरात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी शहर ठाण्यातील हवालदार श्रीमंत यादव यांनी खबर दिली आहे. त्यानुसार दि. १ फेब्रुवारी रोजी शहरात अपघात झाला होता. यामध्ये प्रथमेश विनायक कदम (वय २१, रा. सदर बझार सातारा, मूळ रा. मालगाव, ता. सातारा) हा दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी दुचाकी घसरून विजेच्या खांबाला धडकली. यामध्ये प्रथमेश कदम गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.