पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे पुण्यातील फुले वाड्यात आत्मक्लेश उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनस्थळी जात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणार्थ बाबा आढाव यांचं तिसऱ्या दिवशी पुण्यातील फुलेवाड्यात आत्माकलेष उपोषण सुरू आहे. तिथे जात शरद पवारांनी त्यांची भेट घेतली आहे. आज शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. शरद पवार यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे.
राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या 95 व्या वर्षांत पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे आत्माकलेष उपोषण करत आहेत. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत महात्मा फुले वाड्यात त्यांनी आत्मक्लेश उपोषण सुरु केलं. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. याआधी छगन भुजबळ, रोहित पवार यांनी फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेतली. तर आज शरद पवार यांनी फुले वाड्यात जात बाबा आढाव यांची भेट घेत त्यांचं मत जाणून घेतलं.
निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणं आहे, असं बाबा आढाव यांनी शरद पवारांना सांगितलं. तसंच ईव्हीएमवर शंका घ्यायला जागा आहे, असंही बाबा आढाव शरद पवारांना म्हणाले.
बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकांमध्ये जाऊन जागृत केलं पाहिजे यामध्ये लोकांनी सहभागी घेणं गरजेचं आहे. ईव्हीएम तीस टक्के मत बदलता येते, असं दिसतंय. आमच्याकडे पुरावा नाही. काही लोकांनी आम्हाला दाखवलं आम्ही विश्वास ठेवलं नाही. शेवट आकडेवारी धक्कादायकच आहे काँग्रेस चर्चा झाली आहे. इंडिया आघाडी हा विषय घेतला जाईल. ईव्हीएम घोटाळा आता विश्वास बसत आहे. बहुमत असून देखील राज्याचे काय झाले ते काही अलबेल आहेत अस दिसता नाही, असं शरद पवार म्हणाले.
ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा बाबा आढाव यांनी आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीत लोकशाहीच वस्त्रहरण करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीता निर्णय वेगळा आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा कसा लागतो. ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे हा निकाल आला आहे. या निवडणुकीत सतत मतदानाची टक्केवारी बदलत गेली. तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार. त्यानंतर सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार आहेत. आत्मक्लेष आंदोलन मी इथे करत आहे. गौतम अदानींवर कारवाई झाली पाहिजे. आदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिलं जात नाही. या सरकारच्या विरोधात मी सत्याग्रह करणार आहे, असं बाबा आढाव म्हणालेत.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |