बहिणीला नांदण्यास पाठवत नाही म्हणून २० वर्षीय युवतीला मारहाण; ४ जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 05 March 2026


सातारा : तालुक्यातील लिंब येथे २० वर्षीय युवतीला मारहाण करण्यात आली आहे.या प्रकरणी ४ जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विनोद खटपट्या भोसले, रोहित विनोद भोसले,अनिकेत गब्र्या भोसले, (रा. बनवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि शिणू दर्या भोसले (रा. मालगाव ता. जि. सातारा) यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादीची बहीण जिब्रायल उर्फ गुड्डी फुलेस काळे हिस तुझी मुलगी वैभवी हिला नांदणेस पाठव असे म्हणत चिडून जाऊन तिला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यावेळी ही भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी व फिर्यादीचे चुलते राजा सोन्या भोसले यांनी मध्यस्थी केली असता वरील चौघांनी फिर्यादीला आणि चुलत्याला लाथांनी व बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली आहे. यावेळी अनिकेत गबऱ्या भोसले यांनी तेथील जवळ पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या उजव्या गालावर मारून फिर्यादीला जखमी केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फाईव्हस्टार हॉटेलमधील रूमच्या भाड्यातून महिना दोन टक्के नफा देण्याचे आमिष; साताऱ्यातील ६ जणांची ५८ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक
पुढील बातमी
साताऱ्यातील सोनाराची जावलीच्या दोघांनी केली ५९ लाखांची फसवणूक; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या