विहिरीत पडलेल्या मोराला जीवनदान

खंडाळा तालुका रेस्क्यू टीमची कामगिरी

by Team Satara Today | published on : 10 June 2025


खंडाळा : पुणे- सातारा महामार्गालगत असणाऱ्या बेंगरूटवाडी (खंडाळा) हद्दीत एका विहिरीत पडलेल्या मोराला खंडाळा तालुका रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जीवदान दिले. विहिरीत उतरून घायाळ झालेल्या मोराला बाहेर काढून जंगलात सोडून दिले. या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बेंगरूटवाडी (खंडाळा) खंबाटकी घाटात असल्याने जंगलातून पाण्याच्या शोधात आलेला मोर येथील विहिरीत पडला. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तत्काळ खंडाळा तालुका रेस्क्यू टीमचे सदस्य आनंद गुळुमकर, अजित खंडागळे व काका वाघमारे यांनी विहिरीत उतरून मोराला दोरीच्या साह्याने बाहेर काढले. मोर विहिरीत बराच काळ राहिल्याने तसेच पावसामुळे बचाव न करता आल्याने घायाळ झाला होता. त्‍याच्यावर उपचार करुन नैसर्गिक अधिवासात सोडले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढणार !
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

संबंधित बातम्या