'या' पदार्थांसोबत चुकूनही करू नका लिंबाचे सेवन !

आतड्यांमध्ये तयार होईल भयंकर विष

by Team Satara Today | published on : 17 May 2025


चवीला आंबट गोड असलेला लिंबू आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. विटामिन सी युक्त लिंबाचे सेवन केल्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेला सुद्धा अनेक फायदे होतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग, फोड कायमचे घालवण्यासाठी तुम्ही नियमित लिंबाचे सेवन करू शकता. विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफाय गुणधर्मांनी समृद्ध असलेले लिंबू आरोग्यासाठी महत्वाचे आहे. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय शरीराला अनेक फायदे सुद्धा होतात. जेवणातील पदार्थांसोबत लिंबू पाण्याचे सेवन केल्यास शरीराला फायदे होतील. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू पाणी प्यायले जाते. पण चुकीच्या पदार्थांसोबत लिंबाचे सेवन केल्यास शरीराचे नुकसान होऊ शकते. यामुळे आतड्यांचे कार्य बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिंबासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडणे, उलट्या इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात .

दुग्धजन्य पदार्थ:

लिंबसोबत चुकूनही दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडू शकते. लिंबू आणि दूध हे पदार्थ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हे पदार्थ खाल्यानंतर पचनावर ताण येतो ज्यामुळे उलट्या मळमळ किंवा ऍसिडिटीची समस्या वाढू शकते. तसेच शरीरातील कॅल्शियम शोषणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. लिंबू पाण्याचे सेवन केल्यानंतर दूध किंवा पनीरयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे पचनक्रिया बिघडेल.

खिचडी किंवा डाळी:

रोजच्या आहारात सगळेच लोक डाळ भात किंवा खिचडीचे सेवन करतात. आहारातील या पदार्थांमध्ये जास्त प्रथिने आढळून येतात. मात्र लिंबूमधील अॅसिडिक घटक सर्व प्रथिने शोषून घेतात. ज्यामुळे शरीरातील प्रथिनांची पातळी कमी होऊन जाते. शरीराला आवश्यक असलेली प्रथिने मिळत नाही. त्यामुळे डाळभात किंवा खिचडी खाताना त्यावर लिंबू पिळून खाऊ नये. असे केल्यामुळे अपचन, ऍसिडिटी वाढू शकते.

अंडी:

आरोग्यासाठी अंडी अतिशय पौष्टिक आहेत. अंडी खाल्यामुळे शरीराला कॅल्शियम मिळते. पण अंडी खाल्यानंतर लिंबाच्या रसाचे किंवा लिंबाचे सेवन करू नये. अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आढळून येतात, मात्र त्यावर लिंबू पिळून खाल्यास अंड्यांमधील प्रथिने कमी होऊन जाते. त्यामुळे अंड्यांपासून बनवलेल्या पदार्थांवर लिंबू पिळून खाऊ नये.

काकडी:

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी काकडी खाल्ली जाते. काकडी किंवा काकडीचा रस प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. काकडी आणि लिंबाचे कॉम्बीनेशन आयुर्वेदिक दृष्ट्या चांगले नाही. यामुळे शरीराचे संतुलन बिघडून जाते. त्यामुळे काकडीवर कधीच लिंबू पिळून खाऊ नये. असे केल्यास संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात आणि पचनक्रिया बिघडते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुंबई विमानतळावर ISIS च्या 2 दहशतवाद्यांना अटक
पुढील बातमी
शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात कॅमिओ करणार अभिनेत्री राणी मुखर्जी

संबंधित बातम्या