पवन कल्याण आणि बॉबी देओलची जबरदस्त केमिस्ट्री

चाहते म्हणाले 'ब्लॉकबस्टर चित्रपट

by Team Satara Today | published on : 04 July 2025


दक्षिणेतील स्टार पवन कल्याणचे चाहते त्याच्या हरि हरा वीरा मल्लू’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलरमधील पवन कल्याण आणि बॉबी देओलचा धमाकेदार भूमिकेने चाहत्यांना चकीत केले आहे. समोर आलेल्या ३ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पवन कल्याण वर्चस्व गाजवत आहे. जबरदस्त अ‍ॅक्शन आणि दृश्ये पाहून चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकताही द्विगुणीत झाली आहे.

हा चित्रपट १७ व्या शतकातील मुघल साम्राज्यावर आधारित आहे. हा तेलुगू भाषेतील एक ऐतिहासिक अ‍ॅक्शन अ‍ॅडव्हेंचर चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन क्रिश जगरलामुडी आणि ज्योती कृष्णा यांनी केले आहे. हा चित्रपटाचा पहिला भाग आहे, ज्यामध्ये पवन कल्याणसोबत बॉबी देओल, निधी अग्रवाल, नर्गिस फाखरी, नोरा फतेही, कबीर बेदी आणि सत्यराजसारखे कलाकार काम करताना दिसणार आहेत.

दिग्दर्शक ए.एम. ज्योती कृष्णा यांचा आगामी चित्रपट ‘हरि हरा वीरा मल्लू’ चा ट्रेलर रिलीज होताच हिट झाला आहे. पवन कल्याण आणि बॉबी देओलचा अवतार चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. लोकांना ट्रेलर खूप आवडतो आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच पार्श्वभूमीत एक आवाज ऐकू येतो, ‘जेव्हा एखाद्याला हिंदू असण्याची किंमत मोजावी लागते, ज्या काळात भारताची संस्कृती आणि परंपरा क्रूर राजाच्या पायाखाली तुडवली जात होती, अशा वेळी निसर्गाच्या गर्भातूनच एक खरा योद्धा जन्माला येतो.’ ट्रेलरमधील अ‍ॅक्शन हा चित्रपटाचा गाभा आहे. ज्यामध्ये पॉवर स्टार पवन कल्याण लगेचच एन्ट्री घेतो. ३ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये बॉबी देओलचा खतरनाक लूक देखील दिसत आहे.

अलीकडेच, ‘हरि हरा वीरा मल्लू’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील ‘हरि हरा वीरा मल्लू’ या चित्रपटाच्या अधिकृत हँडलवरून एक पोस्ट करण्यात आली, ‘पॉवर पॅक्ड व्हर्डिक्ट, पवन कल्याणने ट्रेलर पाहिला आणि तो त्याचा उत्साह रोखू शकला नाही. पवन कल्याण गारुच्या तीव्र प्रतिक्रियेने खूप आनंदी झाला आणि (गुरुवार) म्हणजेच आजचे वातावरण खूप उत्साहित होणार आहे. ज्योती कृष्णाने अलीकडेच खुलासा केला होता की त्यांनी २०० दिवसांत चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. या ऐतिहासिक चित्रपटात निधी अग्रवाल नायिका आहे आणि बॉलीवूड स्टार बॉबी देओल औरंगजेबची भूमिका साकारत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘गुरुकुलची दिंडी’ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी दिशादर्शक : जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
हार्ट अटॅक आल्यानंतर कितीवेळ छाती दाबावी?

संबंधित बातम्या