मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

by Team Satara Today | published on : 08 October 2025


काशीळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपर्डे जिल्हा परिषद गटातील अनेक मातब्बर नेत्यांनी आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. 

पार्लेचे माजी सरपंच राहुल पाटील, शहापूर सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार, सह्याद्री कारखान्याचे कामगार नेते नवनाथ पाटील, पैलवान जालिंदर चव्हाण, भास्कर पाटील, शहापूर माजी उपसरपंच राजेंद्र शेलार, शिरवडे सोसायटीचे माजी अध्यक्ष राजन पाटील, यशवंतनगरचे सूरज करांडे, नडशीचे गणेश थोरात, कोपर्डेचे विवेक चव्हाण, 

सुर्ली सोसायटीचे माजी अध्यक्ष अस्लम शिकलगार, पार्ले सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रल्हाद नलावडे, माजी संचालक पांडुरंग पाटील, संचालक सुनील नलावडे, शिरवडेचे अनिल डुबल, कोपर्डेचे शुभम चव्हाण, सैदापूरचे अमोल जाधव, पार्लेचे शेखर नलावडे, जयवंत नलावडे, शशिकांत नलावडे, हेमंत पाटील, प्रदीप पाटील नित्यानंद सागरे आदींनी मुंबई येथील भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी संयोजक महेश जाधव, मंडल अध्यक्ष तुकाराम नलावडे, माजी पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष अॅड. विशाल शेजवळ, खटाव-माण कारखान्याचे संचालक अमोल पवार, महेश चव्हाण, सतीश चव्हाण, श्री. बोराटे उपस्थित होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सुटणार
पुढील बातमी
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कवी कट्टा समिती

संबंधित बातम्या