सातारा : मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अकले तालुका सातारा येथील कोमल मयूर पवार आणि त्यांचे पती मयूर पवार यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच राम बबन चव्हाण, लखन बबन चव्हाण, बबन हरी चव्हाण, मयुरी भरत चव्हाण, आशा राम चव्हाण यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
दरम्यान भरत बबन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय श्रीरंग चव्हाण, राज प्रकाश पवार, यशवंत अशोक चव्हाण, ज्ञानेश्वर अशोक चव्हाण, सागर राजेंद्र चव्हाण आणि जय सुरेश पवार यांनी लोखंडी रॉड ने त्यांना मारहाण केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.