जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

by Team Satara Today | published on : 16 April 2025


सातारा : नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शासनाच्या उपाययोजना राबवणे यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवा साजरा केला जाणार आहे.  विशेष मोहीम स्वरुपात राबविण्यात येणाऱ्या या लोकाभिमुख उपक्रमात सर्व यंत्रणा व घटकांनी सक्रिय सहभाग घ्या, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

यावेळी त्यांनी कोयना नदीपात्रात जलपुजन करुन जल है तो कल है चा संदेश दिला. 15 एप्रिल रोजी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्घाटन करुन 30 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम या उपक्रमांतर्गत घेण्यात येणार आहेत. या उपक्रम शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी सारखर कारखान्याचे संचालक यशराज देसाई आदी उपस्थित होते.

यामध्ये   16 एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे,   17 एप्रिल रोजी स्वछ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भराग,  18 एप्रिल रोजी शेतकरी/पाणी वापर संस्था संवाद, दिनांक 19 एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इ. अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी, दिनांक 20 एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान, दिनांक 21 एप्रिल रोजी उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारीची निरसन करण्यात येणार आहे.

दिनांक 22 एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध घेऊन कार्यवाही करणे, दिनांक 23 एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतीबदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इ. बाबत बैठक/कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम, दिनांक 24 एप्रिल रोजी सिंचन ई-प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुली, थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा, दिनांक 25 एप्रिल रोजी विद्यापीठ/केव्हीके/ सेवाभावी संस्था यांचे समवेत संवाद व कृती कार्यक्रम, दिनांक 26 एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याच पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याबद्दल प्रकरणांचा शोध घेणे,दिनांक 27 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन करण्यात मार्गदर्शन (पूर/मालमत्तेचे रक्षण),दिनांक 28 एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाचे नावे संपादित जमिनींच्या 7/12 उताऱ्यावर नोंदी घेणे/अतिक्रमण निष्कासन दिनांक 31 मे पूर्वी हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुपारच्या जेवणानंतर येणारा आळस अन् झोप होईल गायब
पुढील बातमी
भूसुरुंगाच्या स्फोटाचा दगड लागून शेतकऱ्याचा मृत्यू

संबंधित बातम्या