सातारा : भोंदूगिरी करून 13 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुलै 2018 ते एप्रिल 2019 च्या दरम्यान संतोष श्रवण लोखंडे रा. सातारा याने स्मशानी शक्तींचा वापर करून पैशांचा पाऊस पाडतो, पैसे डबल करून देतो, असे सांगून जहीर अब्बास मनचेकर रा. विलये, ता. राजापूर, जि. रत्नागिरी यांच्याकडून 13 लाख रुपये घेऊन त्यांची तसेच त्यांच्या मित्रांची आर्थिक फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के करीत आहेत.