महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

सातारा : महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका पर्यटन स्थळावरील गावामध्ये स्थायिक असलेल्या महिलेचा धीरज कोंडीबा जाधव रा. सातारा तालुका याने दारूच्या नशेत येऊन संबंधित महिलेशी असभ्य वर्तन केले. तसेच तिला शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबतचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार मंडले करीत आहेत.


मागील बातमी
अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
अपघात प्रकरणी बस चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या