सातारा : पौर्णिमा शेलार-गाढवे यांना जयपूर (राजस्थान) येथील सुरेश ज्ञान विहार विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. 'फार्माकोग्नोसी' या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे.
पौर्णिमा शेलार यांचे आतापर्यंत इंटरनॅशनल जर्नलमध्ये 5 रिसर्च पेपर प्रसिध्द झाले आहेत. 6 इंटरनॅशनल व नॅशनल कॅन्फरन्समध्ये त्यांनी पोस्टर व ओरल प्रेझेंटेशन केले आहे. याशिवाय 1 पेटंटही त्यांनी पब्लिश केले आहे. सध्या त्या अरविंद गवळी कॉलेज ऑफ फार्मसीच्या फार्माकोग्नोसीच्या विभागप्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद गवळी, सचिव निशांत गवळी, प्राचार्य वसंत लोखंडे यांच्यासह शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह कुटुंबिय, नातेवाईक यांच्याकडून कौतुक होत आहे.