चहाचे दुकान फोडून सुमारे साडेतेरा हजारांचे साहित्य लंपास

सातारा : चहाचे दुकान फोडून अज्ञाताने सुमारे साडेतेरा हजारांचे साहित्य लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 ते 9 दरम्यान गुरुवार पेठ, सातारा येथील निहाल नासिर शेख यांचे इराणी चहा नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील 13 हजार पाचशे रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.


मागील बातमी
सुमारे दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या