जाचहाटप्रकरणी पतीवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 December 2024


सातारा : घरगुती कारणावरुन शारीरिक व मानसिक छळ करत, मारहाण केल्याप्रकरणी पतीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पत्नी उर्मिला नीलेश फडतरे (वय 24, रा. संगम माहुली, ता. सातारा, मूळ रा. सिध्देश्वर किरोली, ता. खटाव) यांनी फिर्याद दिली असून, नीलेश लक्ष्मण फडतरे (वय 31, रा. सिध्देश्वर किरोली, सध्या रा. वाडा, जि. पालघर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि. 1 ऑक्टोबर 2021 ते दि. 12 डिसेंबर 2024 या कालावधीत घडला. पोलीस नाईक भोंडवे तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रवाशांना लुटणारे दोन जण बारा तासांच्या आत जेरबंद
पुढील बातमी
युवती बेपत्ता

संबंधित बातम्या