सातारा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे शेतकरी आज ऊस बिलावाचून शांत आहेत. या शेतकऱ्यांचा उद्रेक शुक्रवार दिनांक ११ एप्रिल रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊस बिलासाठी शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यात येणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश राजाराम तथा सोन्या साबळे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये खाजगी सहकारी असे मिळून २१ साखर कारखाने उसाचे गाळप करत आहे. १४ दिवसांमध्ये ऊस तोडणी झाल्यानंतर त्याचे बिल अदा करणे घटनात्मक रित्या बंधनकारक असूनही अद्यापही काहींनी अदा केलेले नाही. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाडीस लागलेली आहेत त्यामुळे शुक्रवार दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले आहे शेतकऱ्यांच्या संपूर्ण पीक कर्ज माफ करा सोयाबीनला पृथ्वी क्विंटल ६००० दर द्या कांद्याला प्रति क्विंटल ४००० दर द्या. त्याचबरोबर विविध शेतकऱ्यांवर पीक कर्जाबाबत शक्तीने वसुली केली जात आहे. उसाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे त्यांच्या सिबिल स्कोर खराब झालेले आहे. अशी मागणी श्री प्रकाश साबळे यांनी केलेली आहे. यावेळी रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे.
या आंदोलनासाठी समाजातील वकील, प्रतिष्ठित नागरिक आणि साखर उद्योगातील व्यावसायिक व सामाजिक जाण असलेले शेतकरी कुटुंबातील पत्रकार सहभागी होणार आहेत. सातारा जिल्ह्यात एक ते दीड कोटी मॅट्रिक टन उसाचे गाळप झालेले आहे. आणि त्या मानाने शेतकऱ्यांच्या उसाचे बिल मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना कोरडी यात्रा करावी लागत आहे. ज्यांना उसाचे बिल मिळाले नाहीत अशी शेतकरी हातबल झाले असून त्यांनी न्याय हक्कासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे.
या आंदोलनाकडे संपूर्ण शेतकरी व जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागलेले आहे.