सातारा : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद कार्यालयामधील तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट समोर व्हरांडयामध्ये तुषार विजय मोतलिंग यांनी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय काम करू नये म्हणून त्यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण करून गोंधळ घातला व दहशत निर्माण केली. याबाबतची फिर्याद राजेंद्र कोंडीराम पाटील रा. विसावा नाका, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 December 2024