सातारा : सातारा शहरामध्ये विनापरवाना स्पीकर लावून आणि रॅली काढून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहरातील 21 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहरातील व्यापार्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यासाठी दमदाटी केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
यामध्ये दिलीप जगताप, पूजा बनसोडे, प्रतीक गायकवाड, संदीप कांबळे, वैभव गायकवाड, नितीन चव्हाण, बाळकृष्ण देसाई, पांडुरंग माने, विनोद ओव्हाळ, दिलीप सावंत, शरद गाडे, अक्षय कांबळे, विश्वास सावंत व इतर आठ जणांवर जबरदस्तीने दुकाने बंद केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी जबाबदार धरले आहे. सातारा शहरातील शाहू चौक, मोती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा ते दोन या दरम्यान संबंधितांनी विनापरवाना स्पीकर लावून रॅली काढली. तसेच बाजारपेठेतील दुकानदारांना जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली. त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे या प्रकरणात उल्लंघन झाले. सातारा शहर पोलिसांनी कलम 189, 119 ( 2) 190, 223, व 351 दोन प्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. के. जायपत्रे अधिक तपास करत आहेत.
विनापरवाना रॅली काढल्याबद्दल 21 जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 22 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा