देगाव ते नवी एमआयडीसी रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे जखमी

by Team Satara Today | published on : 30 April 2026


सातारा :  देगाव ते नवी एमआयडीसी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना दि २७ रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अण्णा मारुती जाधव हे त्याच्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे, भरधाव वेगाने व धोकादायक पद्धतीने चालवित रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. यामुळे देगाव येथील तानाजी सोनबा साळुंखे (वय ६७) हे चालवत असलेल्या होंडा युनिकॉर्न या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.

या अपघातात फिर्यादी राजश्री तानाजी साळुंखे व त्यांचे वडील दोघेही रस्त्यावर पडले. फिर्यादीला डाव्या हाताच्या तळव्यास व उजव्या पायास किरकोळ दुखापत झाली असून, तानाजी साळुंखे यांना उजव्या पायाच्या पंजा, नडगी, गुडघा तसेच उजव्या हाताच्या बोटांना व मनगटाला आणि डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.

या प्रकरणी राजश्री तानाजी साळुंखे (वय ३०, रा. देगाव, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अण्णा मारुती जाधव (रा. देगाव, ता. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वायदंडे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
म्हसवे येथील तरुणी बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल
पुढील बातमी
सदरबझार परिसरातील लक्ष्मी टेकडी येथे एकावर कोयत्याने हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या