01:44pm | Dec 27, 2024 |
सातारा : सहकारी संस्थाचे सक्षमीकरण, सहकारी संस्थाना आधुनिकतेची जोड देणे, ग्रामीण भागात सहकारी संस्थाचे जाळे निर्माण करून ग्रामीण भागाचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी केंद्र शासनाचे सहकार मंत्रालयाने सहकाराचे विकासासाठी पाऊले उचललेली असून, सहकार मंत्रालयाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उदगार सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केले.
"सहकारसे समृद्धी" अंतर्गत दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी देशात १०००० नवीन विकास सेवा संस्था, दुग्ध व मत्स्य सहकारी संस्थाचे शुभारंभ देशाचे सहकार मंत्री मा.अमितजी शहा यांचे हस्ते दिल्ली येथिल कार्यक्रमात करण्यात आले. ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सहकारी संस्था अस्तित्वात नाही, त्या ठिकाणी नवीन विकास सेवा संस्था, दुग्ध व मत्स्य सहकारी संस्था निर्माण करण्याचे लक्ष केंद्र शासनाचे आहे. या निमित्ताने दिल्ली येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सातारा जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दाखवण्यात आले. या प्रसंगी जिल्हा बँकेत सहकार गॅलरीचे उद्घाटन अनिल देसाई यांचे हस्ते करण्यात आले.देशातील सहकार चळवळीचा इतिहास, देशातील सहकारी संस्थाचे उपक्रमाची माहिती, सहकारी चळवळीतील थोर पूरषांचे योगदान, जिल्ह्यातील सहकारी विकास सेवा संस्थाचे विविध उपक्रम सहकार गॅलरीमध्ये दाखवण्यात आले आहे. जिल्ह्यातील नवीन स्थापन झालेल्या विकास सेवा संस्था, दुग्ध व मत्स्य सहकारी संस्थाना उपस्थित मान्यवरांचे हस्ते नोंदणी प्रमाणपत्र देऊन १२ सहकारी संस्थांचा जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच बँकेचे संचालक सुनील खत्री, सुरेश सावंत व संचालिका मा. सौ. ॠतुजा पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे व जिल्ह्यातील विकास सेवा संस्था, दुग्ध व मत्स्य सहकारी संस्थाचे पदाधिकारी, जिल्ह्यतील सहाय्यक निबंधक व इतर मान्यवर उपस्थित होते.
बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाचे कौतुक करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. विकास सोसायट्यांनी आता बहुउददेशीय व्यवसाय करून संस्थांचे सक्षमीकरण करण्यासोबतच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करून ग्रामीण भागाचा आर्थिक व सामाजिक विकास करणेत योगदान देणेचे आवाहन केले.
या प्रसंगी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी देशात तसेच सातारा जिल्ह्यात सहकारी संस्थाचे ग्रामीण अर्थ व्यवस्थेमध्ये योगदान मोठे असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील सहकारी संस्थाचे मातृ संस्था म्हणून जिल्हा बँक काम करते व सहकारी संस्थेच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून योगदान देण्यासाठी जिल्हा बँकेचे मा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ नेहमी आग्रही असतात. जिल्ह्यातील सहकारी विकास सेवा संस्थाचे कामकाज केंद्र शासनाचे एकाच संगणकीय प्रणालीमधून होणार असून याबाबत केंद्र शासनाचे सहकार मंत्रालयाचे निर्णयाचे कौतुक केले.
संजयकुमार सुद्रिक यांनी केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाने सहकारी संस्थेसाठी घेतलेले निर्णया बाबतची माहिती दिली. विकास सेवा सस्थासाठी केंद्र शासनांनी विविध व्यवसायाचे दालन उपलब्ध करून दिले असून, व्यवसायासाठी अनुदानित अर्थ सहाय उपलब्ध करून देत असल्याचे सांगण्यात आले. विकास सेवा संस्थानी आपले कार्यक्षेत्रात नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले तसेच दुग्ध व मत्स्य सहकारी संस्थानीहि ग्रामीण भागात आपले जाळे निर्माण करण्याचे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील सहकारी संस्थाचे बहुसंख्येने पदाधिकारी यांनी उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला. केंद्र शासनाच्या सहकार से समृद्धि अंतर्गत दिल्ली येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तसेच सहकार गॅलरीच्या माध्यमातून सातारा जिल्हा बँक व सहकार विभाग यांनी शासनाच्या विकास संस्था सक्षमीकरण कार्यक्रमाचे माहितीसाठी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, बँकेचे जेष्ठ संचालक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे संचालक व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, बँकेचे संचालक व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, बँकेचे संचालक श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व बँकेचे संचालक माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व मा. सर्व संचालक महोदय यांनी बँकेच्या अधिकारी व शासकीय अधिकार्यांना तसेच विकास सेवा सोसायट्यांच्या पदाधिकार्यांना शासन योजनांच्या अमलबजावणीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
उत्तेकर नगर मध्ये 55 हजारांची घरफोडी |
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
विलासपूर येथे सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार |
रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
आयेशा ताहेर मणेर हिचे सीए परीक्षेत यश |
सरपंच परिषदेचे रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन |
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी संघटनांचा सातारा शहरात मोर्चा |
बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये |
संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे |
तोतया ‘आयपीएस’चा आणखी सोळा जणांना गंडा |
महाबळेश्वरसह जिल्ह्यातील मधपाळ संकटात |
देशातील ग्रामीण भागात नवीन बहुउददेशीय सहकारी संस्था उघडण्याचा निर्णय कौतुकास्पद |
रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
आयेशा ताहेर मणेर हिचे सीए परीक्षेत यश |
सरपंच परिषदेचे रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन |
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी संघटनांचा सातारा शहरात मोर्चा |
बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये |
संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे |
तोतया ‘आयपीएस’चा आणखी सोळा जणांना गंडा |
महाबळेश्वरसह जिल्ह्यातील मधपाळ संकटात |
देशातील ग्रामीण भागात नवीन बहुउददेशीय सहकारी संस्था उघडण्याचा निर्णय कौतुकास्पद |
रोटरी क्लबतर्फे ’राष्ट्र निर्माता’ पुरस्काराने शिक्षकांच्या गौरव |
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार |
कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे 5 दिवस बंद |
मंत्री भरत गोगावले यांचा गड, किल्ला स्वच्छता मोहिमेस पाठिंबा |
युवती बेपत्ता |