सातारा : शहरातील जरंडेश्वर नाका परिसरात अज्ञात चोरट्यांनी चेन स्नॅचिंग केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास सौ. संजीवनी राजेंद्र शिंदे रा. वाढे फाटा, सातारा या जरंडेश्वर नाक्याकडून सदर बाजार ते सारंग मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन पायी जात असताना त्यांच्या पाठीमागून नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या ड्युक केटीएम मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञातांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील तेरा ग्रॅम वजनाची, चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करीत आहेत.