सातारा : शिवीगाळ, धमकी प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सलीम जब्बार बागवान रा. सोमवार पेठ सातारा यांना खोली खाली करण्यासाठी तेथीलच खोलीमालक विष्णू रामचंद्र गोरे आणि त्यांचे मोठे जावई यांनी शिवीगाळ केली आहे.
दरम्यान, शांता विष्णू गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सलीम जब्बार बागवान याने तक्रारदार आणि त्यांच्या पतीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.