अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसकडून आयोजन

by Team Satara Today | published on : 28 July 2026


सातारा : राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या संघटक स्मिता देशमुख तसेच राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस, सातारा जिल्हा यांच्या पुढाकारातून ‘दादांच्या’ वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एक हजारांहून अधिक विद्यार्थिनींच्या विविध 15 प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्याने या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराचे उद्घाटन माजी शिक्षण सभापती संजय देसाई आणि किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संदीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच वेळेवर आरोग्य तपासणी व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये विद्यार्थिनींची रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर तसेच इतर आवश्यक अशा एकूण 15 प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, राजकुमार पाटील, प्राचार्य जयकुमार चव्हाण, डॉ. ऐश्‍वर्या गावडे, समाजसेवक शिवाजी वारुळे, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुजाता भोसले, सुप्रिया देशमुख, सुप्रिया बागडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन स्मिता देशमुख व राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड दक्षिण मतदारसंघातील 56 हजारांहून अधिक संशयित दुबार मतदार नोंदींची सखोल चौकशी करा- पृथ्वीराज चव्हाण यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
पुढील बातमी
पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

संबंधित बातम्या