सातारा : सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातारा शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी प्रल्हाद रमेश पवार वय 20 रा. केसरकर पेठ तालुका जिल्हा सातारा याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सातारा शहरांमध्ये दुचाकी मोटरसायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेला 11 मे 2025 रोजी पवार हा केसरकर पेठ येथे दुचाकीच्या मोटार सायकलसह येणार असल्याची माहिती प्राप्त झाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्या मोटरसायकलची चौकशी केली असता त्याने ती चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आणखी तीन मोटरसायकल चोरल्याचे सांगितले.
या सर्व मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक शाम काळे, सुधीर मोरे, सुजित भोसले, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, तानाजी भोंडवे, इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड,सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ यांनी भाग घेतला होता.